केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बीडीके बी संघाने इंडियन बॉईज बेळगाव संघाचा 3 गडय़ांनी, जॅनो पॅन्थर्स गदग संघाने एसएसएस संघाचा पाच गडय़ानी, हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाचा 32 धावानी पराभव करून प्रत्येकी 3 गुण मिळविले. मणीकांत बुकीटगार (हुबळी स्पोर्ट्स), अब्दुल करीम दिवानअली (हुबळी अकादमी), अभिषेक होण्णावर (गदग) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
राजनगर ग्राऊंड हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिद्धारूड स्वामी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने 40.1 षटकात सर्व बाद 175 धावा केल्या. अभिषेक देशपांडेने 8 चौकारासह 66, अभिषेक सफारेने 35, विष्णू राजपुरमने 18, रवी जितूरेने 11 धावा केल्या. जॅनो पॅन्थर्स गदगतर्फे पवनने 10 धावात 2, प्रसाद कलबुर्गीने 22 धावात 2, अभिषेक होण्णावरने 38 धावात 2, गोपालकृष्ण जी.ने 48 धावात 2 तर मणी सी. ई. ने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना जॅनो पॅन्थर गदग संघाने 29 षटकात 5 गडी बाद 176 धावा करून सामना 5 गडय़ानी जिंकला. त्यात अभिषेक होण्णावरने 1 षटकार, 7 चौकारासह 50, मणी सी. ई.ने 24, गोपालकृष्ण जी.ने 23, प्रसाद कलबुर्गीने 18, रियाज कोटबालने 17, प्रसाद कुलकर्णीने 13 धावा केल्या. सिद्धारूढतर्फे संतोषकुमार ईरापूरने 26 धावात 2, अभिषेक बेलकेरीने 38 धावात 2 तर प्रशांतने 1 गडी बाद केला.
आरआयएस हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने 49.3 षटकात सर्व बाद 201 धावा केल्या. मणीकांत बुकीटगारने 14 चौकारासह 91, पुनीत बिस्वाने 43, अमोल पागदने 30, वृषभ पाटीलने 11 धावा केल्या. टॅलेंट हुबळीतर्फे श्रवणगौडा बिरादारने 20 धावात 2, श्रवण टी.ने 36 धावात 2, अभिलाषने 37 धावात 2, किरण सक्री, भार्गव नाडगेर व विरेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना टॅलेंट संघाचा डाव 36.5 षटकात 169 धावात आटोपला. अनंत नाडगेरने 42, अनुकृत जी.ने 30, श्रवणगौडा बिरादारने नाबाद 26, वीरेशने 17 तर सौरभने 15 धावा केल्या. हुबळी क्रिकेट अकादमीतर्फे बी. विनितने 8 धावात 4, मनिष एम. एस.ने 44 धावात 3, मणीकांत बुकीटगारने 2, सेजल पाटीलने 1 गडी बाद केला.
केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंडियन बॉईज संघने 31.5 षटकात सर्व बाद 106 धावा केल्या. केदार खटावकरने 24, अंजुम मोरबने 20, गौस हाजीने 11 धावा केल्या. बीडीके हुबळीतर्फे पवन जालगारने 12 धावात 3, सौरभ सावंतने 15 धावात 2, भुवन बसडोनी, अब्दुल करीम दिवानअली व विराज हावेरी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीकेने 27.1 षटकात 7 बाद 107 धावा काढून सामना 3 गडय़ांनी जिंकला त्यात अब्दुल करीम दिवानअलीने 31, भुवन बसडोनीने 23, सौरभ सावंतने 12 धावा केल्या.