मुख्यमंत्री बी.एस.येडियुराप्पा यांनी केली घोषणा : कोरोनामुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मिळणार लाभ
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापार, उद्योगधंदे तसेच औद्योगिक क्षेत्रालाही याचा फटका बसला असून अनेकांना नोकऱयाही गमवाव्या लागल्या आहेत. परिणामी अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. अशातच राज्यसरकारने बीपीएल कार्डधारक कुटुंबासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीपीएल कार्डधारक कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला 1 लाख रूपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. आज सोमवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.