मुंबई
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी बीपीसीएलच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला मार्च 2021 मध्ये सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीचे उद्दिष्टही घटवून 8 हजार कोटी इतके करण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये विक्री ही मागच्या वर्षाच्या तुलनेत 90 टक्के राहिली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनी 1 हजार इंधन केंद्रे वाढवणार आहे. जूनला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा दुप्पट म्हणजे 2 हजार 076.17 कोटी झाला, जो मागच्या वर्षी याच कालावधीत 1 हजार 074.12 कोटी रुपये होता.