सध्या हरियाणामध्ये सेवा उपलब्ध ः लवकरच देशातील अन्य ठिकाणी मिळणार सेवा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) यांनी हरियाणामधील लोकांसाठी डिझेलची घरपोच डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली आहे. या सुविधेनंतर हरियाणातील लोकांना घरबसल्या डिझेल विकत घेता येणार आहे. यामध्ये बीपीसीएलने हरियाणात ही सेवा हमसफरसोबत सुरु केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदरची सेवा ग्राहकांना हवी असल्यास त्यांनी किमान 20 लिटरची ऑर्डर द्यावी लागणार आहे. सदरची सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हरियाणातील इंडस्ट्रीयल टाऊनसोबत लहान हाऊसिंग सोसायटी, मॉल्स, रुग्णालय, बँक, कंस्ट्रक्शन साईट, शेतकरी, मोबाईल टॉवर, शिक्षण संस्थांसोबत अन्य लहान उद्योगांना याचा लाभ होणार असल्याची माहिती बीपीसीएलचे सेल्स अधिकारी मयंक सिंह यांनी दिली आहे.
सदरची सेवा सरकारकडून प्रमाणित
डोअरस्टेप डिझेल डिलिव्हरी सरकारकडून प्रमाणित करण्यात आली आहे. हे नवीन युगातील डिझेल वितरण राहणार असून हमसफर यावेळी देशातील विविध राज्यामध्ये आणि शहरांमध्ये डिझेलची घरपोच सेवा देणार आहे.
देशातील प्रमुख ठिकाणांचा समावेश
यामध्ये पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, केरळ, गुजरात, गोवा राज्य यासह राष्ट्रीय कॅपिटल रीजन(एनआरसी) नोएडा, दिल्ली, फरीदाबाद आणि गाझियाबाद याठिकाणी डिझेल वितरणाची वरील सेवा मिळणार असल्याची माहिती आहे.