वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या खाजगीकरणाच्या प्रक्रियेला आणखी विलंब होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरच्या कंपनीचे खाजगीकरण हे आता लांबणीवर पडणार हे स्पष्ट आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीमध्ये बीपीसीएलकरता कोणीही खरेदीदार बोली लावण्याकरीता आला नव्हता. सरकार बीपीसीएलमधील आपला 52 टक्के हिस्सा विकण्याची तयारी करते आहे. याकरिता अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या वेदांत समुहासहित अन्य तीन कंपन्यांनी इच्छा दर्शवली होती.
मात्र बीपीसीएल कंपनीकरता अद्यापही आर्थिक बोली मागविण्यात आलेली नाही. त्यामुळे एकंदरच ही प्रक्रिया आता आणखीन लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट होते आहे.