बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी गुरुवारी यळहंकाजवळील कोगिळू परिसरातील ५.५ एकर जागेवरील अवैध बांधकाम तोडून जमिनीवरील अतिक्रमणे हटविले आहे.
या जागेवर अतिक्रमण झाल्याची बाब आयुक्तांना कळविण्यात आली. तक्रारीची दखल घेत आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी बीबीएमपी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात सामील असलेल्या दोषींवर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या जागेचे मूल्य २५ कोटींपेक्षा जास्त असल्याचे नोंदविण्यात आले आहे.