बेंगळूर /प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्याचबरोबर राजधानीतही रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना बृह बेंगळूर महानगरपालिके (बीबीएमपी) च्या खर्चात आणखी एक भर पडली आहे. कंटेनमेंट एरिया तयार करण्यासाठी व सील करण्यासाठी बीबीएमपीला बॅरीकेडवर मोठा खर्च करावा लागत आहे. बीबीएमपीने आतापर्यंत केवळ बॅरिकेडिंगवर सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
बीबीएमपीचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी सोमवारी प्रति क्षेत्राच्या ठिकाणी बॅरिकेडिंगसाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. एकट्या राजाराजेश्वरी नगर भागात (जून ते ऑगस्ट) कंटेनमेंट झोनच्या बॅरिकेडिंगवर अंदाजे दीड कोटी रुपये खर्च झाले आहेत. असे ते म्हणाले.
बॅरिकेडच्या नावाखाली निधीचा कथित दुरुपयोग केल्याचा मुद्दा आता माध्यमांमध्ये निर्माण झाला आहे. शहरातील वॉर्डातील (भरतीनगर) कंत्राटदाराने बॅरिकेड कंटेनमेंट झोनच्या बॅरिकेडसाठी लोखंडी पत्रे लावले आहेत, त्यासाठी दररोज ६९ हजाराहून अधिकचे बिल सादर केल्याचा आरोप केला जात आहे.