बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यासह राजधानीत कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यापार्श्वभूमीवर बीबीएमपीने कोरोनासचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील अपार्टमेंटमधील जिम, जलतरण तलाव, पार्टी हॉल बंद करण्याची शिफारस केली आहे.
बेंगळूरमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बृह बेंगळूर महानगर पालिका कर्नाटक सरकारला जिम, जलतरण तलाव, अपार्टमेंटमधील कम्युनिटी हॉल आणि उद्यानात ओपन एअर जिम बंद करण्याची शिफारस करेल.
बीबीएमपीचे आयुक्त एन मंजुनाथ प्रसाद यांनी शुक्रवारी “शहरातील अपार्टमेंटमधील जिम, जलतरण तलाव आणि पार्टी किंवा कम्युनिटी हॉल बंद करण्याबरोबरच सर्व बीबीएमपी पार्क्समधील ओपन-एअर जिम बंद करण्याची शिफारस आम्ही करू, असे म्हंटले. याबाबत बीबीएमपी अधिकारी आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातील उच्च अधिकारी यांच्यात प्राथमिक चर्चा सुरु आहे.
पूर्व, पश्चिम, दक्षिण, महादेवपूर आणि बोम्मनहळ्ळी या पाच विभागांमध्ये दिवसभरात १०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आयुक्तांनी सिनेमा हॉल आणि थिएटरमध्ये पर्यायी जागा रिक्त ठेवून हे उद्योगधंदे ५० टक्क्यांपर्यंत खाली आणणे ही आणखी एक शिफारस आहे.