बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय व्यक्ती यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता बीबीएमपीच्या पीआरओ कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच बीबीएमपी महापौरांच्या वैयक्तिक सहाय्यकाची कोरोना चाचणी केली होती. यामध्ये त्याचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यांनतर बेंगळुरूचे महापौर एम. गौतम कुमार आणि बीबीएमपीच्या काही अन्य अधिकाऱ्यांनी स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. तसेच मुख्य कार्यालयातील बीबीएमपी पीआरओ कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने अधिकाऱ्यांनी मंगळवारी ऑफिस सील केलं आहे.
महापौरांचे वैयक्तिक सहाय्यक आणि आणि बीबीएमपीच्या अन्य एका कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने र्नाटकचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी घेण्यात येणारी बैठक तहकूब केली.