ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमधील शिनजियांग प्रांत तसेच कोरोनासंदर्भात खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवत चीनने जगातील प्रसिद्ध मीडिया समूह संस्था असलेल्या ‘बीबीसी’च्या प्रसारणावर चीनने बंदी घातली आहे.
बीबीसी वर्ल्ड न्यूजने प्रसारणासंदर्भातील निर्देशांचे उल्लंघन केले आहे. चुकीच्या बातम्यांमुळे शिनजियांग प्रांतामधील उइगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकावर अन्याय झाला आहे. त्यामुळे बातम्या या खऱ्या असाव्यात, राष्ट्रहिताला मारक नसाव्यात असे चीनने म्हटले आहे.
दरम्यान, चीनमधील चित्रपट, टीव्ही आणि रेडिओ प्रशासनानेही बीबीसीच्या प्रसारणासाठी देण्यात आलेली परवानगी तातडीने रद्द केली आहे.