प्रतिनिधी/ बेळगाव
नाविन्यपूर्ण केकमुळे बेळगाव परिसरात ओळख असणारी बीबीसी बेकरीची चौथी शाखा उद्यमबाग येथे सुरू करण्यात आली. या बेकरीचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. उद्यमबाग येथील खानापूर मुख्य रस्त्यावरील केएसएसआयडीसीच्या बिल्डिंगमध्ये बीबीसी बेकरी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्यमबाग, अनगोळ, मजगाव परिसरातील ग्राहकांना केक व फास्टफूडची चव चाखता येणार आहे.
बेकरीचे संचालक विठ्ठल गवस व विनोद गवस यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बीबीसी बेकरीने अल्पावधीत आपल्या चवीची छाप ग्राहकांवर पाडल्यामुळेच आज चौथी शाखा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी केक सोबतच बेकरी प्रोडक्ट, पिझ्झा, बर्गर, कॉफी, मिल्कशेक, सॅण्डवीच यासारखे फास्टफूड देखील उपलब्ध असणार आहेत. या पदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गवस कुटुंबीयांनी केले आहे. यावेळी राकेश नंदगडकर, विना कियानी यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.