साडेचार हजार मुलींना मिळणार प्रशिक्षण
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य सरकारतर्फे जिल्हय़ातील बीसीएम हॉस्टेलच्या मुलींसाठी आत्मरक्षण व संरक्षण करण्याची योजना सुरू केली असून, या योजनेत जिहय़ातील साडेचार हजार मुलींना प्रशिक्षण देण्याचे काम बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनने घेतले असून त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बीसीएम हॉस्टेल मुलींच्या आत्मसंरक्षणासाठी आखलेल्या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बीसीएम अधिकारी सौ. वाय. बी. नंदी, तालुका अधिकारी राजश्री लतीकमठ, कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर व गजेंद्र काकतीकर, रमेश अलगुडगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते आत्मसंरक्षण योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
या योजनेत रायबाग, चिकोडी, निपाणी, खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल, कित्तुर, बेळगाव शहर आदींचा समावेश आहे. हे आत्मसंरक्षण कराटेचे प्रशिक्षण महिला प्रशिक्षणार्थीच देणार असून, त्यासाठी नताशा अष्टेकर, मनाली कामकर, निधी, राशी जौगुडे व त्या तालुक्मयातील महिला कराटेपटू सहकार्य करत आहेत. वरील सर्व आत्मसंरक्षण कराटेचे मार्गदर्शन जितेंद्र काकतीकर व गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.