ऑनलाईन टीम / कोलकाता :
भारतीय क्रिकेट कंट्रोल बॉर्डचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा मोठा भाऊ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे जॉईंट सेक्रेटरी स्नेहशुष गांगुली यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सौरव गांगुली बुधवारी रात्री पासून होम क्वारंटाइन झाला आहे.
बंगाल रणजी टीमचे माजी खेळाडू स्नेहशीष यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिलेलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून त्यांना थोडा ताप होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांना कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक नियमांनुसार सौरव गांगुलीलाही घरात क्वारंटाइन व्हावे लागणार आहे, अशी माहिती बंगाल क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.