पुढचा मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकमधील : भाजपा आमदार
बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने पक्षात खळबळ माजविणारे विधान केले आहे. कर्नाटक भाजपचे आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांनी असा दावा केला की बी. एस. येडियुरप्पा जास्त काळ मुख्यमंत्री होणार नाहीत आणि त्यांचे उत्तराधिकारी उत्तर कर्नाटकातील असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याची जाणीव आहे.
सोमवारी सायंकाळी एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विजापूरचे आमदार बसणगौडा पाटील यांनी येडियुरप्पा जास्त काळ मुख्यमंत्री राहणार नाहीत. हाय कमांडमधील लोकदेखील त्यांना कंटाळले आहेत. ते उत्तर कर्नाटककडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. भाजप पक्षातील वरिष्ठ नेते येडियुरप्पा यांना कंटाळले आहेत. येडियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री नाहीत, तर फक्त त्यांच्या मूळ जिल्हा, शिवमोगा चे आहेत असे ते म्हणले. कर्नाटकातील पक्षात नेतृत्व बदलल्याबद्दल भाजपच्या आमदाराच्या टीकेला आणखी वजन पडले आहे.
येडियुरप्पा उत्तर कर्नाटक प्रदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत, राज्यात भाजपची सत्ता आहे, फक्त उत्तर कर्नाटक जिल्ह्यातच ज्यामुळे १०० आमदार निवडून येतात. परंतु दक्षिण कर्नाटकातून मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते असे आमदार पाटील म्हणले.