प्रतिनिधी/ बेळगाव
भाग्यनगर येथील रहिवासी व रसिक वाचक बी. डब्ल्यू. आचमनी यांनी लोकमान्य ग्रंथालयास उत्तमोत्तम मराठी व इंग्रजी अशी एकूण 600 पुस्तके भेटीदाखल दिली. या पुस्तकांमध्ये मनाच्या श्लोकातील रहस्य, आपले आरोग्य आपल्या हातात, कृष्णा, संपूर्ण चाणक्मयनीती, सावरकर साहित्य, महाराणा प्रताप अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे.
या पुस्तक भेटीमुळे ग्रंथालयाच्या संग्रहात मोलाची भर पडली आहे. पुस्तकांबद्दल कार्याध्यक्ष अशोक याळगी यांनी आचमनी यांचे आभार मानले आहे.