बेळगाव : सोमवार पेठ येथील बी. बी. सी. बेकरी यांच्याकडे नुकतेच छोटी चौपाटी या नावे नवीन ब्रँडचे भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यांच्याकडील अगोदरच्या पदार्थांबरोबरच बेळगावच्या चोखंदळ खवय्यांसाठी खास चॉकलेट पानीपुरीसह इतर सहा प्रकारचे पानीपुरी लाँच करण्यात आले.
बेळगावकरांसाठी बी. बी. सी. बेकरी यांचे प्रॉडक्ट्स हे नेहमीच पसंतीला उतरलेले आहेत. सतत नवनवीन पदार्थ आणि चविष्ट अशा पदार्थांची रेलचेल आकर्षणाची बाजू आहे. लॉकडाऊनपूर्व सिस्टम मंदीत जात असताना जिथे डाऊनफॉल असतो तिथे वर जाण्याचा मार्गदेखील असतो. अशा प्रकारचे प्रयोग उद्योगधंद्यासाठी सकारात्मक चित्र असल्याचे मनोगत बी. बी. सी. बेकरीच्या सीईओ वीणा खियानी, चेतन नंदगडकर आणि कॅफेचे शिव बालाजी, अक्षय साळवी आदींनी व्यक्त केले.