महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या कार्यक्रमातून सोनी मराठी वाहिनी नफत्य कलाकारांसाठी एक संधी घेऊन आली आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱयांतून नर्तक आपली कला सादर करायला आले आहेत. त्यांतून परीक्षक बेस्ट डान्सर निवडणार आहेत. या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत धर्मेश सर आणि पूजा सावंत.
नफत्यविश्वातलं एक प्रख्यात नाव म्हणजे धर्मेश सर. आपल्या नफत्यानं धर्मेश एका रिऍलिटी शोमधून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्यानं पुन्हा कधी मागं वळून पाहिलं नाही. चित्रपट, डान्स शोज करतकरत आज धर्मेश सर नफत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचला आहे. सिनेसफष्टीतील ग्लॅमरस चेहरा म्हणजे पूजा सावंत! पूजा एका रिऍलिटी शोमधून आपल्या नफत्यानं प्रसिद्ध झाली. मराठी आणि हिंदी चित्रपट करत पूजा यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचली आहे. फार कमी लोकांना माहीत असेल की, सोनी वाहिनीवर झालेल्या बुगी वुगी या कार्यक्रमात 2008 साली पूजा सावंत आणि धर्मेश सर यांनी भाग घेतला होता. धर्मेश सर त्या पर्वाचा विजेताही होता. पूजा आणि धर्मेश सर यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात एकत्र केली आहे. बुगी वुगीच्या टॉप 5 मध्ये पूजा आणि धर्मेश सर दोघंही होते. आज एका तपानंतर दोघेही यशाच्या शिखरावर पोचले आहेत. एका रियॅलिटी शोमधले स्पर्धक ते महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या कार्यक्रमाचे परीक्षक हा प्रवास या दोघांनी एकत्र केला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात आलेले चान्स घेतले आणि आज इथपर्यंत पोचले. सोनी मराठी वाहिनी महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या कार्यक्रमातून अशीच एक संधी घेऊन आली आहे. हा शो 30 नोव्हेंबरपासून, सोमवार आणि मंगळवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे.