गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
भाग्यनगर येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमी आयोजित खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत अनिरूद्ध दासरी यांनी प्रथम क्रमांक संपादन केला.अदिती कुलकर्णी द्वितीय, रचना अनगोळकर तृतीय, विनायक कोळी चौथा, अक्षय शेटवाल पाचवा, समय उपाध्ये सहावा, वैष्णवी वादीराज सातवा, साकेत मेळवंकी आठवा, शिवनागराज नववा व अतुल कब्बे याने दहावा क्रमांक पटकाविला. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या बुद्धिबळपटूंना रोख रक्कम स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा राम सागेकर, संजय आर पोटे व सुजाता उडकेकर यांनी पुरस्कृत केले होते. 38 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता.
‘बुद्धिबळ हा खेळ बुद्धीला चालना देणारा व व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक असतो. कोणत्याही खेळात जय पराजय असतोच. मात्र स्पर्धकांनी अपयश आले तरी खचून न जाता, आपल्या पराभवाचे कारण शोधून पुन्हा जोमाने सराव करावा. अथक परिश्रम केल्यास विजय निश्चित मिळतो’, असे प्रतिपादन डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी केले. बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय राव, सुजाता उडकेकर, प्रशांत अणवेकर, इंद्रायणी जाधव आदी उपस्थित होते. निलेश भंडारी, गिरीश बाचीकर, प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या पदाधिकारी प्रशांत अणवेकर, अक्षता पाटील, महेश निट्टूरकर, सक्षम जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.