क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बी. एम. पाटील यांच्या स्मरणार्थ विजापूर येथील एस. टी. पाटील वाणिज्य महाविद्यालय आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत संत मीरा स्कूलची विद्यार्थिनी निधी दीपक कदम हिने रौप्य पदक पटकाविले.
15 वर्षाखालील मुलींच्या गटात निधी कदम 5 गुणांसह रौप्य पदकाची मानकरी ठरली. प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे मुख्य पंच प्रमोदराज मोरे, क्रीडा निर्देशक दीपक पाटील, समन्वयक डॉ. एस. एस. हणगंडी यांच्या हस्ते तिला पदक, प्रमाणपत्र, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. तिला शाळेचे मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, ऋतुजा जाधव, प्रशासक आर. के. कुलकर्णी, अध्यक्ष परमेश्वर हेगडे, सी. आर. पाटील, वडील दीपक कदम यांचे मार्गदर्शनपर प्रोत्साहन लाभत आहे.