सांगली / प्रतिनिधी
बुधगाव तालुका मिरज येथे सुरू करण्यात येणाऱ्या नवीन पाणी योजनेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. कृष्णा नदीवरील पाणी उपसा केंद्र ते ज्योतिबा नगर यादरम्यान ही चाचणी घेण्यात आली. लवकरच बुधगाव मध्ये नव्या योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. यावेळी उपसरपंच हणमंत कदम, राजेंद्र शिवकाळे, प्रवीण पाटील, अनिल डुबल, धैर्यशील देसाई, अधिकराव पाटील, सचिन पाटील, प्रशांत मोहिते यांच्यासह काँग्रेस आणि नवभारत जनआंदोलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.