मडगाव, वास्को, उस्कईतील रुग्ण : दिवसभरात 202 नवे कोरोनाबाधित : 189 जण झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
राज्यात काल बुधवारी नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने पुन्हा द्विशतक पार पेले. काल 202 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1666 झाली आहे. काल मडगावात दोन, वास्को व उस्कईत प्रत्येकी एक मिळून एकूण चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत पावलेल्यांची संख्या आता 40 झाली आहे. त्याचबरोबर काल 189 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मरणाऱयांची संख्याही वाढत आहे. वास्कोतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 403 झाली तर कुठ्ठाळीची रुग्ण संख्या 341 झाली आहे. मडगाव 108, डिचोली 8, सांखळी 66, पेडणे 5, वाळपई 6, म्हापसा 40 तर राजधानी पणजीत रुग्णांची संख्या 61 झाली आहे. हळदोणा 11, बेतकी 7, कांदोळी 39, कासारवणे 6, कोलवाळ 47, खोर्ली 12, चिंबल 64, शिवोली 15, पर्वरी 18, मये 5, कुडचडे 11 व काणकोणची रुग्णसंख्या 5 झाली आहे.
बाळ्ळी 35, कासावली 14, चिंचिणी 2, कुडतरी 33, लोटली 39, मडकई 9, केपे 10, सांगे 5, शिरोडा 14, धारबांदोडा 43, फोंडा 72 तर नावेलीची रुग्णसंख्या 25 झाली आहे.
गोव्यात 29 जुलैपर्यंत कोरोनाबाधित – 5489
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण – 3784
उपचार घेणारे सक्रिय रुग्ण – 1666
29 जुलै रोजीचे नवे रुग्ण – 202
29 जुलै रोजी बरे झालेले रुग्ण – 189
29 जुलै रोजी झालेले मृत्यू – 4
आतापर्यंतचे एकूण मृत्यू – 40