44 जण झाले कोरोनामुक्त, दोघांचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
बुधवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील 116 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 44 जणांनी कोरोनावर मात केली असून वेगवेगळय़ा इस्पितळ व कोविड केअर सेंटरमधून त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 75 हजार 822 वर पोहोचली आहे. त्यापैकी 73 हजार 331 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 1 हजार 712 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
गेल्या 24 तासांत चिकोडी तालुक्मयातील एक 62 वषीय वृद्धा व रायबाग तालुक्मयातील 67 वषीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचा सरकारी आकडा 779 वर पोहोचला आहे. अद्याप 3 हजार 366 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. आतापर्यंत 9 लाख 53 हजार 313 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 69 हजार 856 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 54 हजार 244 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. गरज भासल्यास त्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. परराज्यांना जाणाऱयांसाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केल्यामुळे चाचणीसाठी गर्दी होत आहे.
हंदिगनूर, बेळगुंदी, गौंडवाड, मोदगा, कडोली, मच्छे, सुळगा, मुतगा, पिरनवाडी, येळ्ळूर, हंगरगा, भाग्यनगर, आदर्शनगर, टिळकवाडी, बसवाण गल्ली, बिम्स कॅम्पस, कॅम्प, अंजनेयनगर, भांदूर गल्ली, हिंदवाडी, वंटमुरी कॉलनी, गांधीनगर, ऑटोनगर, रामलिंग खिंड गल्ली, भारतनगर-वडगाव, सदाशिवनगर, संभाजीनगर-वडगाव, संगमेश्वरनगर, शहापूर, शाहूनगर, टीव्ही सेंटर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.