बेळगाव
कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याची लक्षणे काही दिसत नाहीत. बुधवारी जिल्हय़ात 357 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कोरोनामुळे दहा जण दगावले आहेत. बेळगाव तालुक्मयातील 172 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पोलीस, वैद्यकीय कर्मचाऱयांचाही समावेश आहे.
बुधवारी बेळगाव शहर व उपनगरात 148 जण तर ग्रामीण भागात 24 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हिरेबागेवाडी, रामदुर्ग, हुक्केरी येथील बाधितांसह दहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये बेळगाव शहर व उपनगरातील सात जणांचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळनंतर झालेल्या मृत्यू प्रकरणांची यामध्ये नोंद नाही.