901 नवे रुग्ण, 11 जणांचा मृत्यू : सध्या 16 हजार 557 सक्रिय रुग्ण : प्रशासनाच्या आकडेवारीत तफावत
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. याबरोबरच कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्याही वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. बुधवारी जिल्हय़ातील 830 जण कोरोनामुक्त झाले असून 901 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
ऑक्सिजनचा तुटवडा, वेळेत उपचार न मिळणे, उपचारासाठी सरकारी किंवा एखाद्या खासगी इस्पितळात बेड मिळवूनही वेळेत उपचार मिळत नाहीत म्हणून अनेकांवर मृत्यू ओढावत आहे. गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 415 वर पोहोचला आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 52 हजार 921 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 35 हजार 949 जणांनी कोरोनावर मात केली असून बुधवारी सायंकाळी आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीनमधील माहितीनुसार जिल्हय़ात 16 हजार 557 सक्रिय रुग्ण आहेत. बिम्समध्ये 182 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
बिम्समध्ये उपचार घेणाऱया 17 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे. जिल्हय़ातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. प्रशासनाने केलेली व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. प्रत्यक्ष परिस्थिती आणि प्रशासनाजवळ असलेली आकडेवारी यात मोठय़ा प्रमाणात तफावत आढळून येत आहे.
बुधवारी सांबरा एटीएस येथील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कंग्राळी बी. के., बाळेकुंद्री, बस्तवाड, बेळगुंदी, बंबरगा, गणेशपूर, गौंडवाड, हिंडलगा, होनिहाळ, हुदली, के. के. कोप्प, के. शिवापूर, काकती, कुदेमनी, मच्छे, मुतगा, नंदिहळ्ळी, निलजी, पिरनवाडी, पंतनगर, राकसकोप, येळ्ळूर, सावगाव, सुळेभावी, कावळेवाडी, बडाल अंकलगी, निंग्यानट्टी, कल्लेहोळ परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
अंजनेयनगर, आझमनगर, बसव कॉलनी, बसवण कुडची, खासबाग, जाधवनगर, हिंदवाडी, जेएनएमसी कॅम्पस, काकतीवेस रोड, कणबर्गी,
किर्लोस्कर रोड, कुवेंपूनगर, महांतेशनगर, सदाशिवनगर, शहापूर, शांतीनगर, शास्त्राrनगर, शाहूनगर, शिवाजीनगर, एसपीएम रोड, श्रीनगर, सुभाषनगर, ताशिलदार गल्ली, टिळकवाडी, वडगाव, वैभवनगर, विजयनगर, महात्मा फुले रोड, मल्लिकार्जुन नगर, माळी गल्ली, मेणसे गल्ली, मृत्युंजयनगर, नानावाडी, नार्वेकर गल्ली, नेहरुनगर, राणी चन्नम्मानगर, रेल्वे क्वॉर्टर्स, रामदेव गल्ली, रामतीर्थनगर, भाग्यनगर, कॅम्प परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
गणपत गल्ली, गांधीनगर, चव्हाट गल्ली, गोवावेस, गुड्सशेड रोड, गुरुप्रसादनगर, हनुमाननगर, हिंडाल्को कॉलनी परिसरातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीनमधील माहितीनुसार बुधवारी बाधितांचा आकडा 2 हजार 234 इतका असला तरी बुधवारी प्रत्यक्षात 901 रुग्ण आढळून आले आहेत. जुन्या बाधितांचे आकडे आता अहवालात समाविष्ट करण्यात येत असल्याचे समजते.