पोलीस, वैद्यकीय कर्मचाऱयांना लागण सुरूच, बेळगाव तालुक्मयातील 168 जणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
बुधवारी जिल्हय़ातील 395 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या जवळजवळ 9 हजारांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून रोज साडेतीनशे ते चारशे नव्या रुग्णांची नोंद होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शहर व उपनगरांतील आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिकोडी तालुक्मयातील 2, अथणी तालुक्मयातील 1 व गोकाक तालुक्मयातील 1 असे एकूण 12 जण दगावले आहेत. बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलसह जिल्हय़ातील वेगवेगळय़ा इस्पितळांतून 267 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
आतापर्यंत 4 हजार 925 जण बरे झाले आहेत. तर 3 हजार 690 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. वेगवेगळय़ा प्रयोगशाळेत 943 हून अधिक स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 70 हजार जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
बुधवारचा एकूण बाधितांचा आकडा 395 इतका आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 168 जणांचा समावेश आहे. शहरातील 128 व ग्रामीण भागातील 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे.
मच्छे, कंग्राळी खुर्द, कडोली, हिरेबागेवाडी, काकती, मण्णूर, नंदिहळ्ळी, बस्तवाड, गौंडवाड, हुंचेनहट्टी, येळ्ळूर, यरमाळ, कंग्राळी बी. के., खणगाव, हुलीकवी, राणी चन्नम्मानगर, खासबाग, टिळकवाडी, बसव कॉलनी, द्वारकानगर-चौगुलेवाडी, गवळी गल्ली-बेळगाव, शहापूर, श्रीनगर, हिंडाल्को, कुमारस्वामी लेआऊट, वंटमुरी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
विजयनगर, जुने गांधीनगर, पाटील गल्ली-बेळगाव, अशोकनगर, वझे गल्ली, आदर्शनगर, टीचर्स कॉलनी-खासबाग, गाडेमार्ग शहापूर, शिवबसवनगर, सुभाषनगर, अनगोळ, भाग्यनगर, विनायकनगर, न्यू वैभवनगर, शृंगेरी कॉलनी, महाद्वार रोड, वैभवनगर, उज्ज्वलनगर, व्हॅक्सिन डेपो क्वॉर्टर्स, दत्त गल्ली-वडगाव, हिंदवाडी, सदाशिवनगर परिसरातही बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
न्यू गुड्सशेड रोड, संभाजीनगर-वडगाव, शास्त्राrनगर, संगमेश्वरनगर, नेहरुनगर, रक्षक कॉलनी, बसवन कुडची, कपिलेश्वर कॉलनी, आझमनगर, शाहूनगर, कडोलकर गल्ली, रुक्मिणीनगर, चव्हाट गल्ली परिसराबरोबरच दोन खासगी इस्पितळांतून पाठविण्यात आलेल्या आठ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याबरोबरच गोकाक, संकेश्वर, हुक्केरी, हत्तरगी, कागवाड, अथणी, बैलहोंगल, मुडलगी, निपाणी, चिकोडी, रायबाग, हिडकल, बोरगल, कित्तूर, रामदुर्ग, सौंदत्ती येथील एकूण 395 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जण क्वारंटाईनमध्ये
जिल्हय़ातील वेगवेगळय़ा गावात 21 हजार 530 हून अधिक जण चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 68 हजार 516 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. 57 हजार 936 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळय़ा राज्यांतून गावी परतणाऱयांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे साहजिकच क्वारंटाईनची संख्याही वाढली आहे.
पोलीस, आरोग्य कर्मचाऱयांचा समावेश
बुधवारी सांबरा एअरफोर्समधील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस हेडक्वॉर्टर्समधील 2, एपीएमसी पोलीस स्थानकातील 1, यमकनमर्डी पोलीस स्थानकातील एकाला कोरोनाची लागण झाली. सिव्हिल हॉस्पिटलमधील 5 कर्मचारी व जेएनएमसी गर्ल्स हॉस्टेलमधील दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.