ऑनलाईन टीम / अबू धाबी :
दुबईतील ‘बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे बांधकाम करणाऱ्या अरबटेक कंपनीने आपली दिवाळखोरी घोषित केली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
अरबटेकचे अध्यक्ष वालिद अल मोकररब अल मुहैरी म्हणाले, मागील काही वर्षात बांधकाम व्यवसायामध्ये खेळते भांडवल नसल्यामुळे अरबटेकच्या प्रकल्पांवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे बांधकाम व्यवसाय आणखी अडचणीत आला. कंपनीची आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अरबटेकने आपली कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्थिक स्थितीचा सामना करण्याची क्षमता अरबटेकमध्ये नाही. त्यामुळे कंपनी बंद करून भागधारकांना त्यांना त्याचे पैसे देण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यासंदर्भातील योजना तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.