आ.अरुण लाड यांच्या पाठपुराव्याला यश
कुंडल : वार्ताहर
आमदार अरुण लाड यांनी कृष्णा नदीवरील बुर्ली-खोलेवाडीच्या पुलाबाबत विशेष बाब म्हणून मंजुरी मिळणेबाबत सतत पाठपुरावा केला होता, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी या पुलासाठी 22 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर केला आहे, या नुसार आमदार अरुण लाड यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
प्रजिमा क्रमांक 96 बुर्ली-खोलवाडी पुलामुळे नागठाणे, बुर्ली, खोलेवाडी, पलूस, राजापूर, शिरगाव, विसापूर, हातनूर यामुळे पलूस तालुक्यातील गावांना फायदा होणार आहे.
कृष्णा नदीच्या 2019 च्या पुराच्यावेळची पाणी पातळी विचारात घेऊन या पुलाची उंची ठेवली जाणार असल्याने पुराच्या वेळी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी या पुलाचा उपयोग होणार असून शिवाय या पुलाबाबत संबंधित गावातील नागरिकांची मागणी ही असल्याने आमदार अरुण लाड यांनी वारंवार पाठपुरावा करून या पुलासाठीच्या भूसंपदानासाठी साधारण 1 कोटी 28 लाख रुपये मंजूर झाले आहेत या पुलाच्या मंजुरीने परिसरात समाधानाचे वातावरण आहे तर आमदार लाड यांचे आभार व्यक्त केले जात आहे.