ऑनलाईन टीम / बुलढाणा :
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असल्याची माहीती समोर येत आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या हितीनुसार, बुलडाणा जिह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात झाला आहे. एकूण 15 मजूर होते आणि त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व बिहारी मजूर होते अशी माहीती आहे.
या अपघातात 2 मजूर जखमी झाले आहेत. या जखमी मजूरांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांची ओळखी अद्याप पटली नसून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.