बुकिंग सुरु – चार रंगात होणार उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बूम मोर्ट्सकडून आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्सचे सादरीकरण करण्यात आले आहे. यामध्ये स्कूटरचे नाव कॉर्बेट 14 आणि कॉर्बेट 14 इएक्स असे ठेवले आहे. भारतातील सर्वाधिक टिकाऊ स्कूटर राहणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे. कॉर्बेट 14 स्कूटरची किमत ही 89,999 रुपये असून कॉर्बेट 14 इएक्सची किमत 1,19,999 रुपये राहणार असल्याची माहिती आहे. कंपनीने 12 नोव्हेंबरपासून ई स्कूटरचे बुकिंग सुरु केले आहे.
दोन्ही दुचाकीमध्ये बॅटरीची क्षमता ही वेगवेगळी राहणार आहे. सर्वोच्च स्पीड आणि रेंजमध्येही दोन्ही गाडय़ा वेगळय़ा राहणार असल्याची माहिती आहे. यामध्ये कॉर्बेट 14 मध्ये 2.3 केडब्लूएच बॅटरीची क्षमता ही 65 किमी टॉप स्पीड मिळणार आहे. तर कॉर्बेट 14 इएक्समध्ये 4.6 केडब्ल्यूएच बॅटरीच्या मदतीने टॉपचे स्पीड हे 75 किमी मिळणार असल्याची माहिती आहे.
घरातील प्लगवर होणार चार्जिंग
दोन्ही स्कूटरमध्ये स्वॅपेबल बॅटरी आहे. ज्याच्या मदतीने पोर्टेबल चार्जरसोबत सादरीकरण करण्यात येणार आहे. पोर्टेबल चार्जर कोणत्याही घरातील सॉकेटच्या प्लगमध्ये जोडून चार्जिंग करता येणार असल्याची माहिती आहे.