ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सिंगापूरमध्ये बूस्टर डोस घेतलेल्या दोन नागरिकांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे. ओमिक्रॉनवर बूस्टर डोसही प्रभावी ठरत नसल्याने आता सिंगापूरसह जगाची चिंता वाढली आहे.
सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबरला जर्मनीहून आलेल्या एका प्रवाशामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आला आहे. तर विमानतळावर तपासणी करताना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 24 वर्षीय तरुणीमध्येही ओमिक्रॉनची पुष्टी झाली आहे. ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा घातक नसला तरीही दहापट प्रसार करणारा आहे. त्यामुळे देशात आणखी काही रुग्ण आढळू शकतात. दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्या दोन्ही रुग्णांना पुढील उपचारासाठी कोविड सेंटरला ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना 10 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, सिंगापूरमध्ये 87 टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तर 29 टक्के लोकांनी लसीचा बूस्टर डोसही घेतला आहे.