तणाव कमी करण्याचा प्रयत्न
अमेरिकेच्या सैन्याने रशियासोबतचा तणाव कमी करण्याच्या प्रयत्नानुसार एका आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्याची योजना रद्द केली आहे. फेब्रुवारी महिन्यात रशियाकडून स्वतःच्या आण्विक दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आल्यावर पेंटागॉनने एलजीएम-30जी मिन्युटेमन 3 क्षेपणास्त्राचे परीक्षण करणार असल्याचे म्हटले होते.
तर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनला सुरक्षा सहाय्याच्या स्वरुपात अतिरिक्त 300 दशलक्ष डॉलर्स प्रदान करण्याची घोषणा केली आहे. यात लेझर गायडेड रॉकेट सिस्टीम, ड्रोन आणि वाणिज्यिक उपग्रह इमेजरी सेवा सामील आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी युक्रेनचे विदेशमंत्री दिमित्रो कुलेबो यांच्यासोबत चर्चा करत अमेरिकेकडून करण्यात येत असलेल्या मदतीची माहिती दिली आहे.
तर युक्रेनच्या सुरक्षा दलांनी कीव्हच्या बोरोदियांकाला रशियाच्या सैन्याच्या कब्जातून मुक्त करविले आहे. कीव्हपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावरील हे क्षेत्र पुन्हा युक्रेनच्या नियंत्रणाखाली आले आहे.
युटय़ूबऐजी रुटय़ूब
रशियाने स्वतःच्या विद्यापीटांना स्वतःच्या सर्व युटय़ूब कंटेंटला रशियन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीके व्हिडिओ आणि रुटय़ूबवर हलविण्याचा आदेश दिला आहे. कैदी आदान-प्रदानच्या दुसऱया फेरीत रशियाकडून 86 युक्रेनियन सैनिकांची मुक्तता करण्यात आली आहे. ही अदलाबादली एक एप्रिल रोजी पार पडली आहे. मुक्तता झालेल्या सैनिकांमध्ये 15 महिलांचाही समावेश असल्याची माहिती युक्रेनच्या उपपंतप्रधान इरीना वेरेंशुक यांनी दिली आहे. तर रशियाचे किती सैनिक मुक्त करण्यात आले याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.