बेंगळूर/प्रतिनिधी
आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती ज्यांच्या घराची मंगळवारी जमावाने रात्री तोडफोड केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यांनंतर श्रीनिवासमूर्ती यांनी सरकारकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना श्रीनिवासमूर्ती यांनी सीबीआय किंवा सीआयडी चौकशीची मागणी केली. तसेच या घटनेचा माझा काही संबंध नाही. पेट्रोल बॉम्बचा वापर करून जमावाने माझ्या घरावर हल्ला केला. मी मुख्यमंत्री आणि मंत्री आर. अशोक यांच्याकडे पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली आहे.
नवीन यांच्याविषयी बोलताना त्यांनी काल रात्री सोशल मीडियावरील ज्या अपमानजनक पोस्टमुळे हिंसाचार झाला, तो नवीन माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे आणि आम्ही गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्याशी संपर्कात नाही. असे ते म्हणाले आहेत.