वृत्तसंस्था/ लंडन
बेंगळूर जगातील सर्वात वेगवान टेक्नॉलॉजी केंद्र म्हणून उदयास येत असल्याची माहिती एका संशोधनामधून समोर आली आहे. यासंदर्भात लंडनमध्ये करण्यात आलेल्या एक संशोधनात 2016 पासून बेंगळूर जगात सर्वात वेगाने वाटचाल करत राहिली असल्याचे म्हटले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासह इतर क्षेत्रातही बेंगळूरने आघाडी घेतली आहे.
सदरच्या यादीमध्ये बेंगळूरनंतर युरोपातील शहरांमधील लंडन, म्युनिख, बर्लिन आणि पॅरिस यांचा नंबर लागतो आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱया मुंबईचा सदर यादीमध्ये सहावा क्रमांक आहे, अशी माहिती लंडन ऍण्ड पार्टनर्स डीलरुम.कॉम यांच्या आकडेवारीतून देण्यात आली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार बेंगळूरमध्ये 2016 मध्ये 1.3 अब्ज डॉलरपासून 5.4 पटीने गुंतवणूक वाढली आहे. 2020 मध्ये हा आकडा 7.2 अब्जवर राहिला आहे. यामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये याचदरम्यान 1.7 पटीने गुंतवणूक वाढून 70 कोटी डॉलर ते 1.2 अब्ज डॉलरवर राहिली आहे.
दुसऱया बाजूला ब्रिटनची राजधानी लंडनमधील गुंतवणूक ही तीन पटीने वाढून 3.5 अब्ज डॉलर ते 10.5 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. लंडन ऍण्ड पार्टनर्समधील भारताचे मुख्य प्रतिनिधी हेमिन भडूचा यांनी यावेळी म्हटले आहे, की बेंगळूर आणि लंडन यांच्यातील गुंतवणूक तेजीत राहिल्याची बाब खूप समाधानाची ठरली आहे.