बंगळूर/प्रतिनिधी
राज्यात बाधितांची संख्या वाढत असताना बेंगळूर पालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) गुरुवारी शहरातील अधिकृत सामाजिक आरोग्य सेविका (आशा) यांच्या १३२२ नवीन पदांच्या भरतीची घोषणा केली.
बीबीएमपीचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी सध्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) १,२२९ आशा कामगारांना मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगितले. आता, प्रत्येक ५ हजार लोकसंख्येसाठी एक आशा सेविका असेल. १,२७,५६,०२९ लोकसंख्येसाठी २०२०-२१ कालावधीत एकूण २५५१ आशा कामगार असतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.