बेंगळूर : वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेड राखून न ठेवलेल्या बेंगळूरमधील 5 खासगी इस्पितळांना महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मागील आठवडय़ात आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शहरातील खासगी इस्पितळांना कोविड रुग्णांसाठी 50 टक्के बेड राखून ठेवण्याची सूचना दिली होती. मात्र, काही इस्पितळांनी याकडे साफ दुर्लक्ष करत किरकोळ प्रमाणात बेड राखून ठेवले आहेत. परिणामी, सोमवारी बेंगळूर महापालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी कोलंबिया एशिया, फोर्टिस, ऍस्टर सीएमआय, विक्रम आणि बाप्सिस्ट या प्रतिष्ठित खासगी इस्पितळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Previous Articleकन्नड शब्दकोषतज्ञ प्रा. वेंकटसुब्बय्या यांचे निधन
Next Article तालुका-जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पडणार लांबणीवर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.