बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाचा आलेख दिवसागणिक वाढतच आहे. त्यापाठोपाठ राजधानी बेंगळूरमध्येही कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. शुक्रवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या वाढून ३६,५२१ इतकी झाली आहे. तर राज्यात कोरोनाचे ८६,३४७ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ८,९६० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बेंगळूरमध्ये गेल्या २४ तासांत २,७२१ रुग्णांची भर पडली.
राज्यात शुक्रवारी ७,४६४ रुग्णांना कोरोनातून बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यापैकी बेंगळूर शहरातील २,१४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात शुक्रवारी १३६ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ४१ जण बेंगळूर मधील आहे. बेंगळूर शहरी जिल्ह्यात आतापर्यंत १,८८६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.