बेंगळूर/प्रतिनिधी
सावधगिरीने अंमलात आणल्या जाणार्या एका गुप्त कारवाईत शहर पोलिसांनी तीन जणांना अटक करून त्यांच्याकडून ५०० किलो गांजा जप्त करून अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा भंडाफोड केला. बेंगळूरमध्ये वितरणासाठी वापरल्या जाणार्या या मालची किंमत १ कोटींपेक्षा जास्त आहे. १० दिवस चाललेल्या या कारवाईत पुरंद पोलीस निरीक्षक अंबरीश एम, उपनिरीक्षक रंगप्पा आणि कॉन्स्टेबल मूर्ती यांच्यासह पोलीस उपायुक्त (व्हाईटफील्ड) डी. देवराज यांचा समावेश होता. दरम्यान बेंगळूरमध्ये अलिकडच्या काळात अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे.
याआधी ड्रग तस्करी आणि सेवन प्रकरणी कन्नड चित्रपट सृष्ठीतील कलाकारांवर कारवाई झाली आहे. राज्यात ड्रग संदर्भात सीसीबी कडक कारवाई करताना पाहायला मिळत आहे.