बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकची राजधानी बेंगळूरमध्ये बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बेंगळूर व आसपासच्या भागात बुधवारी मुसळधार पाऊस पडेल असे म्हंटले आहे.
२१ तासांत ६६.८ मिमी पावसाची नोंद
मंगळवारी बेंगळूरमध्ये मुसळधार पाऊस पडला. बेंगळूरमध्ये २१ तासांत ६६.८ मिमी पावसाची नोंद झाली. बेंगळूरच्या अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी रात्री व बुधवारी लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.