बेंगळूर/प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी बेंगळूरमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली होती. दरम्यान शुक्रवारी बेंगळूरच्या अनेक भागात मुसळधार पावसाने पाणी साचलेले पाहायला मिळाले. मुसळधार पावसाने नाले ओसंडून वाहत होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मुसळधार पावसाने दक्षिण बेंगळूरचा बहुतांश भाग पाण्याखाली होता.
रस्त्यावर पाणी साचल्याने वृषभवती नाल्यासमवेत होसकेरेहळ्ळीजवळील गुरुदत्त लेआउटमध्ये एक कार पाण्यावर रतरंगाताना दिसली. काही अपार्टमेंटच्या तळघर आणि सखल भागातील घरे पाण्यात बुडून गेली.
पावसामुळे म्हैसूर रोड, रेशीम बोर्ड जंक्शन, होसूर रोड, बन्नेरघट्टा रस्ता, बसवणगुडी, नयनदहळ्ळी, आरआर नगर, बीजी रोड आणि अन्य रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली होती.