बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर सध्या सक्रिय रुग्णांची संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. दरम्यान बंगळूरमध्ये नवीन कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने बृह बेंगळूर महानगर पालिकेने गुरुवारी शहरात आणखी पाच कंटेनर झोन असल्याचे जाहीर केले. यामध्ये गोवर्धन रेसिडेन्सी, अभिजना भवन बिल्डिंग बीईएल लेआउट, पहिला मेन चिक्काबोमासंद्र (तीनही येळहंका झोनमधील), अॅडमिरल्टी व्हेन्यू (पूर्व विभाग) आणि शिव कृपा निलय (दशरहळ्ळी झोन) यांचा समावेश आहे.
यासह, शहरातील एकूण सक्रिय कंटेन्ट झोनची संख्या १२ झाली. कर्नाटकची राजधानी गेल्या २४ तासांत ९२५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सर्वाधिक नोंद आहे.