बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही जास्त आहे. गेल्या २० दिवसात बेंगळूर शहरी जिल्ह्यात विक्रमी कोरोना मृतांची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी कोविडच्या पहिल्या लाटेच्या वेळी राज्यात झालेल्या मृतांची संख्या पाहता या आकड्यापर्यंत पोहचण्यासाठी कर्नाटकला जवळपास सहा महिने लागले होते.परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विचार करता १ मेपासून २० दिवसात ४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
बेंगळूरमध्ये १ मेपासून अवघ्या २० दिवसात ४ हजार रुग्णांचा मृत्यू झाल्याने नवा विक्रम झाला आहे. यावरून असे दिसून येते की कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत घातक आहे, हे सिद्ध होते.