बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर पोलिसांनी मोठी कारवाई करत गेल्या दोन आठवड्यांत शहरातील ड्रग्स विक्रीच्या आरोपाखाली ६१ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी ५१.५ किलो गांजा, ६०० ग्रॅम अफू, ९०० ग्रॅम ब्राउन शुगर आणि ७० ग्रॅम एमडीएमए जप्त केले आहेत. याविषयी माहिती देताना बेंगळूर शहर, पश्चिम विभाग, पोलीस उपायुक्त (डीसीपी) संजीव पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात ड्रग विक्री विरूद्ध कडक मोहीम राबवली जात आहे. कालपर्यंत ४२ गुन्हे दाखल केले आणि १२१ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी 121 ग्राहकांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.