आरोग्य कर्मचाऱयांसमोर आणखी एक आव्हान : महापालिकेकडून खबरदारी
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा तडाखा बसलेला असतानाच कोरोनामुक्त होणाऱयांमध्ये ब्लॅक फंगस आढळून येत आहेत. बेंगळूरमध्ये असे 33 रुग्ण आढळून आल्याने भीती निर्माण झाली आहे. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रात कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. यापाठोपाठ बेंगळूरमध्येही असे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱयांसमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे.
दीर्घ काळ आयसीयु, व्हेंटिलेटरवर उपचार घेतलेल्या बाधितांमध्ये ब्लॅक फंगस आढळून आला आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारे, उपचारावेळी अधिक स्टेरॉईड्स घेतलेल्या कोरोना रुग्णांवर ब्लॅक फंगसचा हल्ला होत आहे. ‘म्युकोर मायकोसिस’ नावाने ओळखल्या जाणाऱया या फंगसमुळे डोळे, मेंदू, श्वसनक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो. मागील वर्षी अशा फंगसमुळे 8 जणांपैकी 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर दोघांना कायमस्वरुपी अंधत्व आले होते.
बेंगळूरमध्ये अलिकडेच ब्लॅक फंगस आढळून आला असून कोरोना रुग्णांसमोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. बेंगळूर महापालिका आरोग्याधिकाऱयांच्या लॅब रिपोर्टनुसार शहरात अधिकृतपणे 33 प्रकरणे आढळली आहेत. हा आकडा 50 च्या घरात असल्याचे समजते. खासगी इस्पितळांमध्येच अशा 38 रुग्णांवर उपचार केले जात आहेत, अशी माहिती बेंगळूर महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी विजयेंद्र चोळन यांनी दिले आहे. फंगस आढळून आलेल्या रुग्णांवर योग्य उपचार करण्यासंबंधी वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. चिकित्सेपुर्वी डॉक्टर, परिचारिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बुधवारी संसर्गमुक्तचा आकडा दिलासादायक
राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण कमी होत असतानाच संसर्गमुक्त होणाऱयांचे प्रमाणही वाढल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याचवेळी रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. राज्यात बुधवारी 517 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. तर दिवसभरात 39,998 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत 34,752 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 5,92,182 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 20,53,191 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी एकूण 14,40,621 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर एकूण 20,368 जणांचा मृत्यू झाला आहे.