बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी वाहतूककोंडीच्या समर्थनार्थ शनिवारी बेंगळुरमध्येही काही ठिकाणी वाहतूक रोखत शेतकऱ्यांनी निषेध केला. शनिवारी संपूर्ण देशात तीन राज्ये वगळता राष्ट्रे आणि राज्य महामार्ग रोखून निषेध करण्यात आला.
दरम्यान कर्नाटकात ठीक ठिकाणी शेतकऱ्यांच्या निदर्शनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. म्हैसूर बँक चौक, साधळ्ळी गेट, देवनहळ्ळी रोड, येळहांका नवीन पोलीस स्टेशन चौक येथे शेतकर्यांनी निदर्शने केली. हातात हिरवा झेंडा घेऊन शेतकर्यांच्या निदर्शनामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. कन्नड समर्थक नेते वाटाळ नागराज यांनाही म्हैसूर बँक चौक येथून ताब्यात घेण्यात आले.
बेंगळूरबरोबरच, राज्याच्या इतर भागांतील शेतकऱ्यांनीही दिल्ली सीमेवर आंदोलनकरणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवित महामार्गावरील वाहतूक रोखली. मंड्या, हसन, म्हैसूर, चामराजनगरसह इतर जिल्ह्यांत शेतकर्यांनी कृषी कायद्याविरोधात निषेध केला. गुलबर्गा येथेही शेतक्यांनी निषेध मोर्चा काढला.