बेंगळूर / प्रतिनिधी
भारतीय हवामान खात्याने (IMD) दक्षिण कन्नड, उत्तरा कन्नड आणि उडुपी या किनारी कर्नाटक जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बेंगळुरूमध्ये दिवसभर 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानासह ढगाळ हवामान असेल अंदाज आहे. शिवमोग्गा, चिकमंगलूर, हसन आणि दक्षिण कर्नाटकातील बहुतांश जिल्ह्यांतील किनारी कर्नाटक आणि मलनाड जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू राहील.
संततधार पावसामुळे चामराजनगर जिल्ह्यातील सुवर्णवती जलसाठ्यातील पाण्याची पातळी 11 वर्षांनंतर कमालीची वाढली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जलाशयाच्या दोन गेट्समधून 900 क्युसेक पाणी सोडले जात आहे. दरम्यान, राज्यातील 14 हून अधिक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, 15 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, चिक्कमगलूर, हसन, कोडागु, चित्रदुर्ग, शिवमोग्गा, दावणगेरे, दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तरा कन्नड जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस पडत आहे आणि सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील होची बोरानहट्टी गावात रविवारी पावसामुळे शेजारच्या घराची भिंत कोसळून एका गर्भवती महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
सततच्या पावसानंतर, बेंगळूरचे हवामान गुरुवारी सुमारे 18 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे जवळजवळ 7 अंशांनी घसरले. आयएमडीने सांगितले की गुरुवारी बेंगळूर शहरात कमाल तापमान 19.8 डिग्री सेल्सियस , तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. हा पाऊस बंगालच्या उपसागरातील दबावाचा परिणाम असून ज्यामुळे चेन्नई आणि तामिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि पूर आला आहे.