बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात अमली पदार्थ तस्करी प्रकरणी सीसीबी पोलिसांकडून चौकशी सुरु असताना यशवंतपूर पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणार्या तीन तरुणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सलीम (वय 26), सय्यद तंजीम (वय 32) आणि मोहम्मद शिबान (वय 21) रा. यशवंतपूर येथील रहिवासी जे.पी. उद्यानाच्या मैदानालगत असलेल्या गाडीत अंमली पदार्थांची विक्री करण्याचा विचार करीत होते. गस्ती पोलिसांनी तिन्ही तरुणांना अटक केली आणि दोन किलो चरस व १०० ग्रॅम भांग जप्त केली आहे.
तामिळनाडूतील ऊटी येथील आरोपी रहमानने अंमली पदार्थ विक्री नंतर जास्त कमिशन देण्याचे आश्वासन दिल्याचे तपासात पुढे आले आहे. जास्त पैशाच्या लोभापायी तरुणांना ड्रग्स विकण्याची योजना आखून ते मैदानाच्या ठिकाणी आले होते. पोलिसा गुन्हा नोंदवून रहमानचा शोध घेत आहेत.