बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रांच पोलिसांनी गुरुवारी अश्लील साइटवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आणि व्याख्याते यांचे फोटो अपलोड करणाऱ्या दोन तंत्रज्ञांना अटक केली आहे.
सीसीबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारी, आर्थिक गुन्हे आणि अंमली पदार्थ (सीईएन) पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या सात तक्रारींच्या आधारे अजय थानिकचालम (वय ३७) आणि राईयनगर येथील विकास रघोतम (वय २७) या दोन यांना अटक करण्यात आली.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी हे दोन्ही आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्याख्यातांचे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम व फेसबुक प्रोफाइलमधून विविध अश्लील वेबसाइटवर अपलोड करीत होते. यांनतर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या सात तक्रारींच्या आधारावर या दोन आरोपींना अटक केल्याचे त्यांनी सांगितले.