बेंगळूर/प्रतिनिधी
पाच महिन्याहून अधिक दिवस बंद असणारे मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी केंद्रांनी परवानगी दिली आहे.नियमांचे पालन करत श्रेणीबद्ध पद्धतीने मेट्रो गाड्या सुरु झाल्यानंतर बेंगळूर मेट्रोचे कामकाज आता शुक्रवारपासून सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मेट्रो गाड्या दर पाच मिनिटांनी (सकाळी 8 ते ११ वाजता) आणि ( सायंकाळी ४.३० ते संध्याकाळी ७.३०) दरम्यान चालवल्या जातील असे म्हंटले आहे.
कोरोना साथीच्या आजारामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यावेळी कोरोना संसर्ग वाढल्याने पाच महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मेट्रो सेवा सोमवारी पुन्हा सुरू झाली आहे.