बेंगळूर/प्रतिनिधी
आता पेटीएम अॅपवर बेंगळूर मेट्रो कार्डचा रिचार्ज करता येणार आहे. पेटीएमने याबाबत माहिती दिली आहे. पेटीएमने घोषित केले की बेंगळूरची मेट्रो स्मार्ट कार्ड रिचार्ज सुविधा उपलब्ध आहे. त्याच्या अॅपवर ही सुविधा देण्यात अली आहे.
पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, नेटबँकिंग आणि कार्ड्स वापरुन आता ग्राहक स्मार्ट कार्डचे रिचार्ज करु शकतात, असे पेटीएमने एका निवेदनात म्हटले आहे.
पेटीएम म्हंटले आहे, की ही सुविधा सुरक्षिततेस प्रोत्साहन देईल, प्रवाशांना सामाजिक अंतर राखण्यास आणि लांब रांगा टाळण्यास मदत करेल.