बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात विधानसभेच्या दोन तर विधान परिषदेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजप, काँग्रेस आणि जेडीएसकडून स्वतंत्र निवडणूक लढवली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
काँग्रेसकडून आज राजाराजेश्वरी नगर( आर. आर. नगर) मतदारसंघातून आगामी पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवार एच. कुसुम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या उपस्थित होते. पोटनिवडणुकीसाठी मतदान ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.